‘इराणकडून आदर ही गुरुकिल्ली’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
gaining respect from iran the key to peace
वॉशिंग्टन : ‘इराण-इस्त्राईल युद्ध संपल्यानंतर शांतता टिकवून ठेवण्यासाठी इराणकडून ‘ आदर ’ मिळणे हीच गुरुकिल्ली असेल,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली झाल्यास कच्च्या तेलाचा मोठा पुरवठा सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोमवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जोपर्यंत ते आपला आदर करतात, तोपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. मला 'भीती' हा शब्द वापरायचा नाही, कारण तो अयोग्य ठरेल.’