कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स
कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
केंद्रीय राज्यमंत्री व नरेंद्र मोदी सरकारमधील एकमेव ख्रिश्चन मंत्री असलेले जॉर्ज कुरियन यांनी अपेक्षेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला असून, राष्ट्रपती भवनाने मंगळवारी कुरियन यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

६५ वर्षीय कुरियन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या खात्यांचे राज्यमंत्रीपद भूषवले होते. ते ऑगस्ट २०२४ पासून मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार होते. खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपला. भाजपने केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. उमेदवारी नाकारल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली होती.