‘गीतेंचा पक्षप्रवेश माझ्या संमतीनंतर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
gokul gites entry into shiv sena darades claim
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक नाट्यमयरीत्या जिंकणारे गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले. गीते यांच्या शिवसेना प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. ‘नाराज होऊ नकोस,’ असे सांगून त्यांनी माझी समंती घेतल्याचा दावा पराभूत नरेंद्र दराडेंनी केला. पक्षाचा एक आमदार कमी होऊ नये, या हेतूने मी स्वत: या प्रवेशाला होकार दिला,’ असेही दराडे यांनी सांगितले.