Rape And Murder Of 11 year old Girl In Delhi Suspect Arrested
अकरावर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : फूटपाथवर आपल्या कुटुंबासोबत झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच, नंतर तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजधानी दिल्लीत समोर आली आहे. संशयिताने गुन्हा लपवण्यासाठी मुलीचा मृतदेह वनक्षेत्रात फेकून दिला होता. मात्र, सहा तासांच्या आतच त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आमदारकीची शपथनाशिक : नाशिक विधान परिषद जागेवर विजयी झालेल्या गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्यानंतर मंगळवारी (दि. २३) विधान परिषदेत सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी विरोधी सदस्यांनी ‘जय गिरीश महाजन’ अशी घोषणा देताच सभागृहात एकच हशा पिकला.
सविस्तर वृत्त...३
परप्रांतीय ठार
निफाड : ओझर येथे मुंबई आग्रा रोडवर असलेल्या एचएएल उड्डाणपुलावर नाशिक बाजूकडे जाणाऱ्या लेनवर पुढे जात असलेल्या ट्रकने ब्रेक मारल्याने त्यामागे येणारी दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. राजा मनोज रजक (वय १८, रा. कटिया, ता. शिवणी, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. ओझर पोलिसांनी ट्रकचालक साहेबराव खंडू अहिरे (रा. खडकजांब, ता.चांदवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.