शनिवार, २७ जून रोजी दुपारी ४.३० वाजता धरमपेठेतील व्हीआयपी रोडवरील वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात ही एकदिवसीय परिषद होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहील. नागपूर आणि अमरावती हा संपूर्ण परिसर ‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, कडक उन्हाळा आणि लहरी हवामानामुळे संत्रा उत्पादक अडचणीत सापडला आहे. या बदलत्या हवामानात संत्रा बागा कशा टिकवायच्या आणि त्यांचे संगोपन कसे करावे, याचे थेट मार्गदर्शन शेतकऱ्यांना या कॉन्क्लेव्हमध्ये मिळणार आहे. कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. विनायक शिवणकर, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत कृषी शास्त्रज्ञ तसेच एआयतज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे, नीरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गजानन खडसे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू मार्गदर्शन करतील. संत्रा शेतीला नवसंजीवनी देणाऱ्या आणि शेतकऱ्यांना प्रगतीची नवी दिशा दाखवणाऱ्या या ऑरेंज कॉन्क्लेव्हमध्ये विदर्भातील संत्रा उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मटा’तर्फे करण्यात आले आहे.ऑरेंज कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कार्यक्रमस्थळी कुपन दिले जाणार आहे. त्या कुपनवर शेतकऱ्याने स्वत:चे नाव, मोबाइल नंबर आणि पत्ता भरून द्यायचा आहे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ईश्वरचिठ्ठी (लकी ड्रॉ) काढण्यात येईल. त्यानुसार, पाच भाग्यवान विजेत्यांना आधुनिक कृषी उत्पादन पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये पेट्रोलसंचालित फवारणी यंत्र, बॅटरीवरील फवारणी यंत्र यांचा समावेश आहे.