कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

बारामती तालुक्यातील पारवडी येथे भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २५ वर्षीय रूपाली मयूर कोकणे यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू
बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी येथे एका भीषण अपघातात २५ वर्षीय रूपाली मयूर कोकणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत रूपाली गंभीर जखमी झाल्या होत्या, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (४ मार्च) रात्री पावणेनऊच्या सुमारास मयूर कोकणे हे पत्नी रूपाली आणि दोन मुलांसह दुचाकीवरून पारवडीकडे जात होते. त्याचवेळी एमएच-४२, बीजे/ १४०४ या क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला समोरील बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत रूपाली कोकणे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या अपघाताची माहिती सचिन शिवाजी कोकणे (वय ३६, रा. पारवडी) यांनी बारामती तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार थोरवे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.