पार्किंग धोरणासाठी आग्रह

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री डेव्हिड यांनी महापालिकेकडे पार्किंग धोरणाची मागणी केली आहे. खासगी बसच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या धोरणामुळे महापालिकेला उत्पन्न मिळेल. तसेच, पवार नगर, गावंड बाग, उपवन - येऊर मार्गावर टीएमटी बससेवा आणि वसंत विहार नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

demand to implement parking policy in mumbai

मुंबईतील खासगी बसची घुसखोरी रोखण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्त्वाच्या विभागात महापालिकेने पार्किंग धोरण लागू करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री डेव्हिड यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत केली. महापालिकेने पार्किंग धोरण न ठरवल्याने मोकळ्या रस्त्यांवर मुंबईतील खासगी बसची पार्किंग होत आहे. पोखरण क्र. १, पोखरण क्र. २ तसेच मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दररोज रात्री बसच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. महापालिकेने पार्किंग धोरण लागू केल्यास उत्पन्न मिळू शकेल. मात्र, त्यातून स्थानिक नागरिकांच्या वाहनांना वगळावे. त्याचप्रमाणे पवार नगर, गावंड बाग, उपवन - येऊर मार्गावर दहा मिनिटांनी 'टीएमटी'ची बससेवा, वसंत विहार नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही केली.