मुंबईत तुरळक ठिकाणी तापमान ३८पार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. पश्चिम उपनगरातील राम मंदिरात सोमवारी ३८.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विक्रोळी, विद्याविहार आणि दहिसर येथेही तापमान ३५ अंशांच्या वर होते. शहरात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

temperature in mumbai exceeds 38 degrees celsius

मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात पश्चिम उपनगरातील राम मंदिर या ठिकाणी ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तर, विक्रोळी येथे ३५.३, विद्याविहार येथे ३४.७ आणि दहिसर येथे ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.