केंद्र व राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलेल्या दिलाशाचे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने स्वागत केले आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेमार्फत व्यावसायिक एलपीजीवरील १८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या व्यावसायिक एलपीजीवर १८ टक्के जीएसटी लागू असल्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. गॅस दरांत झालेल्या वाढीमुळे लहान हॉटेल, रेस्टॉरंट चालक तसेच ऑटो रिक्षाचालकांचे मासिक बजेट विस्कळीत झाले आहे. पूर्वी ५५ ते ६० रुपयांच्या दरम्यान असलेले दर आता ८० ते ८५ रुपयांपर्यंत पोहोचलेे. कमर्शियल एलपीजीवरील जीएसटी दरांत तातडीने कपात करावी. यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल.






