पूर्व द्रूतगती महामार्गाशेजारी कॅडबरी जंक्शननजीक असलेल्या माॅलमध्ये सोमवारी पुन्हा आग लागली. गेल्या आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
सोमवारी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. हॉटेलच्या स्वयंपाकघरामधील चिमणीला ही आग लागली होती. ही आग मॉलचे कर्मचारी व ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आटोक्यात आणली.






