स्वत:चा ब्रँड सुरू करायचाय?

महाराष्ट्र टाइम्स

स्वतःचा ब्रँड सुरू करण्याची इच्छा आहे. यासाठी 'ब्रँड स्ट्रॅटजी आणि सोशल मीडिया मास्टरक्लास' आयोजित केला आहे. ५ एप्रिल रोजी ही ऑनलाइन कार्यशाळा होईल. यात ब्रँड कसा तयार करावा, सोशल मीडियावर वेगळेपण कसे निर्माण करावे याचे मार्गदर्शन मिळेल. उद्योजक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ३० दिवसांचा सोशल मीडिया अ‍ॅक्शन प्लॅन मिळेल. विशाखा विश्वनाथ मार्गदर्शन करतील.

स्वत:चा ब्रँड सुरू करायचाय?
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आजच्या डिजिटल युगात ब्रँडिंगचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रभावी ब्रँड स्ट्रॅटजी आवश्यक ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘ब्रँड स्ट्रॅटजी आणि सोशल मीडिया मास्टरक्लास’ ही विशेष कार्यशाळा ५ एप्रिल रोजी स. ११ ते सायं. ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

या मास्टरक्लासमध्ये ब्रँड म्हणजे काय, तो कसा तयार करायचा, सोशल मीडियावर वेगळेपण कसे निर्माण करायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कन्टेंट स्ट्रॅटजी, स्टोरीटेलिंग, ऑडिअन्सशी कनेक्ट होण्याचे मार्ग आणि एआयचा प्रभावी वापर यावरही विशेष भर दिला जाणार आहे. ही कार्यशाळा उद्योजक, छोट्या व्यवसायाचे मालक, क्रिएटर्स, फ्रीलान्सर्स आणि डिजिटल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. सहभागीांना ३० दिवसांचा सोशल मीडिया अ ॅक्शन प्लॅन आणि प्रभावी ब्रँड तयार करण्यासाठी आवश्यक स्किल्स शिकण्याची संधी मिळणार आहे.

कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रॅक्टिकल आणि अ ॅक्टिव्हिटी-आधारित सत्रे, वास्तविक उदाहरणांवर आधारित मार्गदर्शन आणि ब्रँड व कन्टेंट फ्रेमवर्क्सची ओळख. यामुळे सहभागी स्वतःचा ब्रँड व्हॉइस विकसित करून सोशल मीडिया स्ट्रॅटजी अधिक प्रभावीपणे तयार करू शकतील. ही कार्यशाळा ब्रँड कम्युनिकेशन आणि डिजिटल स्ट्रॅटजी क्षेत्रातील तज्ज्ञ विशाखा विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. त्यांनी आतापर्यंत ३००हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून विविध क्षेत्रातील ब्रँड्ससोबत काम करण्याचा सहा वर्षांहून अधिक अनुभव आहे. डिजिटल क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी ठरणार आहे. अधिक माहितीसाठी आणि कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ८१०८४६७६८१ (फोन) आणि ९८१९५८१०७७ या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करावा.