रिक्षा ‘बंद’मुळे प्रवाशांचे हाल

Contributed byअब्दुल वाजेदAbdul.Wajed@timesofindia.com,@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारला. एलपीजी रिक्षाचे दर वाढल्याने चालक नाराज आहेत. या आंदोलनामुळे शहरात रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि इतर प्रमुख मार्गांवर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी प्रवाशांना उतरवून आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली.

रिक्षा ‘बंद’मुळे प्रवाशांचे हाल

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी रिक्षाचे वाढविलेले दर यामुळे रिक्षा चालकांना फटका बसतोय. रिक्षा चालकाच्या विविध मांगण्यासाठी रिक्षा चालकांकडून सोमवारी आंदोलनाचा ईशारा देण्यात आला. रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे शहरात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, चिकलठाणा, कर्णपुरा मैदान चौक, सिडको, वाळूज महानगर, टिव्ही सेंटरसह जालना रोड आणि बीडबायपासवरील नियमित प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद ठेवण्यात आले. रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागला.

सोमवारी रिक्षा चालकांच्या विविध संघटनांकडून विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी भाग घ्यावा. यासाठी विविध रिक्षा चालक संघटनांकडून सकाळी प्रवासी वाहतुकीसाठी निघालेल्या रिक्षा चालकांना विनंती करून त्यांना आंदोलनात सहभागी होण्याबाबत रिक्षा चालकांकडून विनंती करण्यात येत होती. अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी रिक्षा अडवून प्रवाशांना उतरवून रिक्षावाल्यांच्या रिक्षा बंद करण्यास भाग पाडलं. रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांसह सीबीएस आणि सिडको बस स्थानकावरील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

सिडको उड्डाणपुल ते जयभवानीनगर चौक ते रेल्वे स्टेशन तसेच सिडको उड्डाणपुल ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर किंवा सूतगिरणी शिवाजीनगर, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नियमित रिक्षांची संख्याही कमीच होती. याशिवाय सिडको बस स्थानकातून चिकलठाणा तसेच केंब्रीज चौकापर्यंत जाणाऱ्या मार्गावर रिक्षाची संख्या नगण्य होती. तसेच जालना रोड बाबा चौक, रेल्वे स्टेशन ते शहागंज, रेल्वे स्थानक ते वाळूज बजाजनगर, पंचवटी चौक ते वाळूज, पंचवटी चौक ते मिटमिटा, तसेच शहराच्या अंतर्गत भागात शहागंज ते नारेगाव, कचरापट्टी, शहागंज ते पिसादेवी, रेल्वे स्थानक- हर्सूल, शहागंज ते जटवाडा, बीड बायपाससह अन्य मार्गावर रिक्षांची संख्या कमी होती.