शाश्वत, ओवी, गिरिजा अव्वल

महाराष्ट्र टाइम्स

पुणे महापौर करंडक मल्लखांब स्पर्धेत शाश्वत बोरकर, ओवी महाबळेश्वरकर, शिवजित वाळकुंदे आणि गिरिजा पुराणिक यांनी अव्वल स्थान मिळवले. कोथरूड येथील आयडियल कॉलनी मैदानावर ही स्पर्धा पार पडली. नगरसेविका तेजश्री पवळे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत ४०० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. पुणे शहरासह बारामती, शिरूर, जुन्नर, तळेगाव दाभाडे, दीघी, निगडी येथील खेळाडू सहभागी झाले होते.

शाश्वत, ओवी, गिरिजा अव्वल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शाश्वत बोरकर , ओवी महाबळेश्वरकर , शिवजित वाळकुंदे, गिरिजा पुराणिक यांनी पुणे महापौर करंडक मल्लखांब स्पर्धेत आपापल्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला.

कोथरूडमधील आयडियल कॉलनी मैदानावर ही स्पर्धा झाली. विजेत्यांना नगरसेविका तेजश्री पवळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी ज्योत्स्ना कुलकर्णी, दिनेश माथवड, सत्यजित शिंदे, अरविंद करंदीकर, सुजय गोडबोले आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी ४०० हून अधिक खेळाडूांनी सहभाग नोंदवला आहे. पुणे शहरातीलच नाही, तर बारामती, शिरूर, जुन्नर, तळेगाव दाभाडे, दीघी, निगडी येथील खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित होते.

शाश्वत, ओवी, गिरिजा अव्वल

शाश्वत, ओवी, गिरिजा अव्वल

निकाल : १० वर्षांखालील मुले - शाश्वत बोरकर (संस्कृत विद्या मंदिर) - ७.६० गुण; अर्जुन पायगुडे (संस्कृत विद्या मंदिर) - ७.१५ गुण; पृथ्वीराज शिर्के (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय) - ६.६५ गुण.

१० वर्षांखालील मुली - गिरिजा पुराणिक (विराज स्पोर्ट्स अकादमी) - ७.५० गुण; मिहिरा कर्वे (पुणे स्पोर्ट्स अकादमी) - ७.२५ गुण; त्रिशा पाटील (नवजीवन स्पोर्ट्स अकादमी) - ७.२० गुण.

१२ वर्षांखालील मुली - ओवी महाबळेश्वरकर (पुणे स्पोर्ट्स अकादमी) - ८.०० गुण; रेवा भागवत (विराज स्पोर्ट्स अकादमी) -७.८५ गुण; स्पृहा लांडगे (इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी) - ७.७० गुण.

१४ वर्षांखालील मुले - शिवजित वाळकुंदे (शरद स्पोर्ट्स क्लब) - ८.३० गुण; अर्णव गुरव (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय) - ८.१५ गुण; संग्राम परांडे (नवजीवन स्पोर्ट्स अकादमी) - ७.७५ गुण.