‘ठाकरेंनी फिरविला मंत्रिपदाचा शब्द’

महाराष्ट्र टाइम्स

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र, मला राज्यमंत्रिपद देण्यात आले. शंकरराव गडाख यांना माझ्याऐवजी कॅबिनेट मंत्री केले गेले. मंत्रिपदाच्या अटीवरच त्यांना पाठिंबा दिला होता, असा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

the promise of ministerial position given by thackeray

‘ शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मला एकट्या अपक्षाला मंत्री केले नव्हते, तेव्हा मला ते कॅबिनेट मंत्रिपद देणार होते. पण देताना राज्यमंत्रिपद दिले. शंकरराव गडाख यांना माझ्याऐवजी कॅबिनेट मंत्री केले. ठाकरेंनी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण, नंतर कॅबिनेट मंत्रिपद शक्य नाही असे सांगितले. मात्र, या मंत्रिपदाच्या अटीवरच त्यांना पाठिंबा दिला होता’, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी केला.