नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत खत उत्पादन स्थिर राहिले असून, सरकारने खरीप हंगामापूर्वी तुटवड्याची भरपाई करण्यासाठी ३७ लाख टन युरियाची आयात करण्याचे निश्चित केले आहे. मार्च-एप्रिल या कालावधीत देशांतर्गत युरिया उत्पादन ३७.४९ लाख टनांवर पोहोचले असून, ते गेल्यावर्षीच्या पातळीइतके आहे.
मार्च-एप्रिल दरम्यान एकूण देशांतर्गत खत उत्पादन ६२.३७ लाख टन झाले आणि आयात १५.३९ लाख टन होती. संकटाच्या परिस्थितीत खतांच्या उपलब्धतेत सुमारे ७८ लाख टनांची भर पडली. मार्चमध्ये १६.४९ लाख टन युरिया उत्पादन झाले.







