आश्रय हॉस्पिटलमध्ये आयसीयू खाटा

महाराष्ट्र टाइम्स

डोंबिवलीतील आश्रय हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरसह १० खाटांचा नवीन अतिदक्षता विभाग सुरू झाला आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि डॉ. आचार्य लॅबोरेटरीजच्या सहकार्याने हा विभाग आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांसाठी सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेतून आलेल्या देणगीतून तीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोल यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. हा विभाग डॉ.

आश्रय हॉस्पिटलमध्ये आयसीयू खाटा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

डोंबिवली तील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सुविधेसह १० खाटांच्या नवीन अतिदक्षता विभागाचे उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि डॉ. आचार्य लॅबोरेटरीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना अत्यंत माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

या आयसीयूमध्ये तीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध आहे. हे व्हेंटिलेटर्स अमेरिकेतील लता शास्त्री आणि नरसिंह हेगडे परिवार यांनी दिलेल्या देणगीतून उपलब्ध झाले आहेत. या केंद्राचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोल यांच्या हस्ते झाले. यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, प्रमुख पाहुण्या उषा आचार्य यांसह अनेक रोटेरियन सदस्य उपस्थित होते. हा प्रकल्प आश्रय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील आणि सचिव नरसिंह हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आला असून, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा विभाग डॉ. निखिल शिंदे व पथकाच्या देखरेखीखाली कार्यान्वित झाला आहे.