पनवेलमध्ये स्वगणना मोहीम सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पनवेल महापालिकेत घरगणनेसाठी ऑनलाइन स्वगणना मोहीम सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनी महापौर नितीन पाटील यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही स्वतःच्या घराची माहिती भरून ग्रामीण भागातील मोहिमेला सुरुवात केली. १५ मेपर्यंत ही मोहीम तालुक्यात चालेल. नागरिक वेबसाइटवर किंवा प्रगणकांकडून माहिती भरू शकतात. प्रगणक मोबाइलवर माहिती नोंदवतील.

launch of self counting campaign in panvel

पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील घरगणनेसाठी ऑनलाइन स्वगणना मोहिमेला महाराष्ट्र दिनी सुरुवात करण्यात आली. पालिका क्षेत्रातील स्वगणनेची सुरुवात महापौर नितिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, तर प्रांतअधिकारी कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःच्या घराची माहिती भरून पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वगणना मोहीमेचा शुभारंभ केला.

१५ मेपर्यंत तालुक्यात ही मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त अभिषेक पराडकर यांनी दिली. प्रत्येक नागरिक जनगणनेच्या वेबसाइटवर जाऊन स्वगणना करू शकतो. शिवाय प्रगणक घरोघरी जाऊन गणना करणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही गणना असल्यामुळे प्रगणक मोबाइलवरच माहिती भरून घेतील. पालिकेत पार पडलेल्या कार्यक्रमात महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांनी आपापली माहिती भरली. प्रगणक घरी जाऊन स्वगणना करणार आहेत.