जागोजागी अपूर्ण कामे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. जागोजागी खोदकाम करून रखडलेली कामे धोकादायक ठरत आहेत. कंपनीने डांबरीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. किरकोळ कामांकडे लक्ष दिले जात नाही. सूचना फलक, सुरक्षा यंत्रणा आणि तक्रार निवारण याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता अपघाताची शक्यता वाढली आहे.

incomplete work on highways a deadly trap

महामार्गाचे काम कधी वेग घेते तर अचानक मंदावते, अशी परिस्थिती आहे. मोक्याच्या ठिकाणी जागोजागी खोदकाम करून रखडलेली कामे मृत्यूचा सापळा बनली आहेत. महामार्गावर कंपनीने कुठेही डांबरीकरण हाती घेतलेले नाही. अनेक किरकोळ कामांकडे लक्ष दिले जात नसल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरला आहे. सूचना फलक, सुरक्षा यंत्रणा, तक्रार निवारण व देखरेख याकडे लक्ष देण्यात कंत्राटदार अपयशी ठरत आहे.