मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्युट) यादरम्यान दोन दशकांहून अधिक काळापासून ‘मिसिंग’ राहिलेल्या सुमारे १३ किमीच्या अत्यंत आव्हानात्मक व महत्त्वाकांक्षी रस्त्याचे अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे मुंबई-पुणे प्रवासादरम्यान ३० मिनिटांची बचत होण्यासह इंधनाचीही मोठी बचत आणि सुलभ रस्त्याचा मोठा दिलासा दोन दशकांनंतर नागरिकांना मिळाला आहे.
द्रुतगती मार्गावरील घाटातील वळणांचा प्रवासही आता टळणार आहे. म्हणूनच, ‘या प्रकल्पावर सात हजार १८१ कोटी रुपये खर्च झाले असले तरी भविष्यात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटी रुपयांची गती देणारी ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ची ही कनेक्टिंग लिंक आहे’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने द्रुतगती मार्गावर खोपोली एग्झिटजवळ या ‘कनेक्टिंग लिंक’वरील पूल क्रमांक १वर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी (पान ८वर)






