आयसीएसई, आयएससीनिकाल ९९ टक्क्यांवर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सीआयएससीई मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. दोन्ही परीक्षांचे निकाल ९९ टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीही मुलींनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यासोबतच, इस्रायलमध्ये हिजबुल्लाहने ड्रोनचा वापर केला आहे. अमेरिकेत संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांचा डेमोक्रॅट खासदारांशी वाद झाला.

आयसीएसई, आयएससीनिकाल ९९ टक्क्यांवर

मुंबई : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) मंडळाच्या ‘आयसीएसई’ (दहावी) आणि ‘आयएससी’ (बारावी) परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. दोन्ही परीक्षांचा निकाल पुन्हा एकदा ९९ टक्क्यांच्या घरात लागला आहे. देशभरात ‘आयसीएसई’चा निकाल ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा निकाल ९९.१३ टक्के लागला. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांत मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे.

इस्रायलविरुद्ध ड्रोन

तेल अविव : हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये युद्धासाठी एक नवे शस्त्र म्हणून लहान आकाराच्या ड्रोनचा वापर केला आहे. ते पातळ अशा ‘फायबर ऑप्टिक’ तारेद्वारे नियंत्रित केले जाते. ते इलेक्ट्रॉनिक तपासणीतूनही निसटतात. युक्रेन युद्धात वापरलेले हे ड्रोन आकाराने लहान आहेत आणि ते खूप धोकादायक आहेत.

हेगसेथ-डेमोक्रॅट वाद

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांचा डेमोक्रॅट खासदारांसोबत वादविवाद झाला. लोकप्रतिनिधी सभेच्या सशस्त्र सेवा समितीच्या सुनावणीदरम्यान इराण युद्धाबाबत नागरिकांची दिशाभूल केल्याच्या आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याच्या आरोपांना त्यांना सामोरे जावे लागले. सहा तास चाललेल्या सुनावणीत वातावरण तापले. यामध्ये ट्रम्प प्रशासनाच्या १,५०० अब्ज डॉलरच्या संरक्षण अर्थसंकल्पावर चर्चा झाली.