गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दोन मृत्यूप्रकरणात पोलिसांनी ड्रग्जचा मुख्य पुरवठादार महेश ऊर्फ मार्क खेमलानी याला शुक्रवारी अटक केली. या प्रकरणानंतर गायब झालेला महेश पोलंड येथून मुंबईत परतताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अटकेने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १२वर पोहोचली आहे. महेश याने एक्स्टसीच्या गोळ्या आणल्या कुठून आणि त्याच्यापुढे आणखी काही साखळी आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय प्रॉडक्शन यांच्या वतीने ‘९९९९९९९९९ - टेक्नो इव्हेंट’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या ‘एमबीए’च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्यवध, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून विहान ऊर्फ आकाश समळ, सनी जैन, रौनक खंडेलवाल, बालकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे आणि आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल, आयुष साहित्य, प्रदीप गुप्ता आणि जिया जेकब या अकरा जणांना अटक केली. या सर्वांची चौकशी आणि तपासामध्ये (पान ८वर)






