एअर इंडियाकडून शेकडो उड्डाणे रद्द

महाराष्ट्र टाइम्स

एअर इंडियाने शेकडो विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे विमान कंपन्यांना खर्च व महसूल जुळवणे कठीण झाले आहे. अनेक मार्गांवर सेवा देणे किफायतशीर राहिलेले नाही. युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर उड्डाणे कमी होतील.

एअर इंडियाकडून शेकडो उड्डाणे रद्द
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अमेरिका-इराण युद्ध चिघळून हवाई इंधनाचे दर वाढल्याने टाटा उद्योग समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने दररोज किमान १०० विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

आंतरराष्ट्रीय विमानांसाठीच्या इंधनाच्या (एटीएफ) किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारतातील सर्वच प्रमुख विमान कंपन्यांना खर्च व महसूल यांचे गणित जुळवणे कठीण झाले आहे. अनेक मार्गांवर सेवा देणे एअर इंडियाला किफायतशीर राहिलेले नाही, हे यामागील प्रमुख कारण असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एअर इंडियाच्या या निर्णयाचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही सेवांवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. एअर इंडिया सध्या दररोज अंदाजे १,१०० उड्डाणे चालवते व या कपातीमुळे त्यांच्या एकूण उड्डाणांची संख्या किमान १० टक्क्यांनी कमी होईल.

एअर इंडियाच्या उड्डाणांची सर्वांत मोठी कपात युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर अपेक्षित आहे. या मार्गांवर विमान इंधनाचा वापर सर्वाधिक आहे आणि नफ्याचे गणित जुळवताना कंपनीवर सतत दबाव वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईला लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोरोंटो, सॅन फ्रान्सिस्को, सिडनी आणि मेलबर्नशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील उड्डाणांची संख्या यामुळे कमी होण्याची चिन्हे आहेत. सिंगापूरसारख्या जास्त मागणी असलेल्या ठिकाणच्या विमानांच्या फेऱ्यांमध्येही कपात होऊ शकते. जागतिक स्तरावर जेट इंधनाच्या किंमती (पान ८वर)