(पान एकवरून) मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एअर इंडियाचा हा निर्णय याच पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
एका आकडेवारीनुसार आखाती युद्ध भडकल्यानंतर गेल्या काही आठवड्यांत एटीएफच्या सरासरी किंमतीत जवळपास ८० टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामुळे कार्यान्वयन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. अलीकडेच इंडिगो, एअर इंडिया व जेट एअरवेजने केंद्र सरकारच्या हवाई उड्डाण मंत्रालयास पत्र लिहून कैफियत मांडली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या भाड्यात वाढ न केल्यास सेवा बंद कराव्या लागतील, असा इशाराही दिला होता.






