कपडे, केस, नखांवरील डाग, कलिंगड कापण्यासाठी वापरण्यात आलेली सुरी, घरातील पाणी याचाही तपास करण्यात येणार आहे. अंतर्गत शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे डाग, मारल्याच्या-भाजल्याच्या खुणा किंवा शारीरिक अत्याचार याचा समावेश आहे का, याबद्दल कसून पाहणी होत असल्याचे कळते.
मूत्रपिंडाची बायोप्सी
न्यायवैद्यक विभागामधील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी कोणत्या अवयवांवर कसा परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी मूत्रपिंडातील काही अवशेष घेण्यात आले असून, त्याची बायोप्सी करण्यात येणार आहे. ते आल्यानंतर मूत्रपिंडाचे कार्य निकामी होण्यासाठी कोणते घटक अधिक परिणामकारक होते याची वैद्यकीय तपासणी अधिक नेमक्या प्रकारे करण्यात येईल, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.






