(पान एकवरून) अंतरामध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच ७० ते ८० वाहने नादुरुस्त होऊन बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांचे अतोनात हाल झाले. नवी मुंबई येथून पुण्याला लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या प्रवाशांची गाडी नादुरुस्त झाल्याने बच्चेकंपनीचे हाल झाल्याचे सांगण्यात आले. कार नादुरुस्त झाल्याने बोनेट उघडून रस्त्यावर उतरावे लागल्याचे कराड येथे निघालेल्या प्रवाशांनी सांगितले. तर, वीकेंड आणि सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन कनेक्टिंग लिंकचे उद्घा टन सकाळी लवकर करणे आवश्यक होते, असे मत सातारा येथे निघालेल्या वाहनचालकाने व्यक्त केले.






