१,७४५ कोटींचे कोकेन जप्त

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एनसीबीने ऑपरेशन 'व्हाइट स्ट्राइक' अंतर्गत मुंबईत कोकेन तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले. कळंबोली-भिवंडी पट्ट्यात केलेल्या कारवाईत ३४९ किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १,७४५ कोटी रुपये आहे. गोदामांच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा वापर करून ही तस्करी सुरू होती.

cocaine worth 1745 crores seized in mumbai major international trafficking bust

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ऑपरेशन ‘व्हाइट स्ट्राइक’ राबवत महामुंबईत कोकेन तस्करीचे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त केले. या कारवाईत ‘एनसीबी’ने उच्च दर्जाचे ३४९ किलो कोकेन जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १,७४५ कोटी इतकी आहे.

‘कोकेनच्या तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ‘एनसीबी’च्या पथकांनी कळंबोली-भिवंडी पट्ट्यात छापेमारी केली. त्यावेळी गोदामांच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा आधार घेत अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे आढळले. कळंबोली येथे एका (पान ८वर)