‘गॅस’ला दरवाढीचा चटका

Contributed byम. टा. विशेष प्रतिनिधी / वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

निवडणुका संपताच गॅस आणि इंधनांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ९९३ रुपयांनी महागला असून मुंबईत ३,०२४ रुपयांना मिळणार आहे. हवाई इंधनाचे दरही वाढले आहेत. मात्र, घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि देशांतर्गत विमान इंधनाचे दर सध्या स्थिर ठेवले आहेत. कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतारांचा फटका सामान्यांना बसू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.

impact of lpg cylinder price hike on industry

निवडणुकांची धामधूम संपल्यावर केंद्र सरकारने विविध इंधनदरांमध्ये मोठी वाढ केली आहे. व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत शुक्रवारपासून ९९३ रुपयांनी वाढवली गेली आहे. यामुळे हा सिलिंडर किरकोळ बाजारात मुंबईत ३,०२४ रुपयांना मिळेल. व्यावसायिक एलपीजीमधील ही आजवरची सर्वांत मोठी वाढ ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांसाठीच्या हवाई इंधनांच्या (एटीएफ) दरात प्रति किलोलीटर ७६.५५ डॉलरची (पाच टक्के वाढ) करण्यात आली आहे. तसेच, प्रीमियम डिझेलच्या दरांतही वाढ करण्यात आली आहे. इराण युद्धामुळे कच्च्या खनिज तेलाच्या दरांचा भडका होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल आणि देशांतर्गत हवाई सेवेसाठीच्या एटीएफ दरात तूर्त कोणताही बदल केलेला नाही.

इंधनांच्या नव्या किंमती राज्यांनुसार लागू असलेल्या स्थानिक करांमुळे (उदा. व्हॅट) वेगवेगळ्या असू शकतात, अशी पुस्ती जोडण्यात आली आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांमधील बेभरवशाच्या चढ-उतारांची झळ सामान्यांना बसू नये यादृष्टीने इंधनाच्या किंमतींत सध्या बदल केलेला नसल्याचे तेल कंपन्यांनी सांगितले. या दरवाढीमुळे विशेषतः व्यावसायिक वापरातील इंधन महागले असून, उद्योग आणि आतिथ्य (पान ५वर)