पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबामधील चार जणांचे मृत्यू फळे कुजण्यामुळे निर्माण झालेल्या रासायनिक प्रक्रियेतून की, विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होऊन झाले, यादृष्टीने न्यायवैद्यकीय विश्लेषण केले जात आहे. प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतडी यांसारखे मुख्य अवयव हिरव्या रंगाचे झाल्याचे आढळल्याने विषद्रव्याचा वापर झाला काय, या दिशेनेही तपास सुरू आहे.
डोकाडिया कुटुंबाने खाल्लेल्या बिर्याणीमध्ये काही विषद्रव्याचा समावेश होता का किंवा कलिंगडामध्ये विषद्रव्ये टोचण्यात आली का, याविषयी चाचणी सुरू आहे. अफूच्या अतिरिक्त मात्रेच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे. हे औषध कॅन्सरग्रस्तांना वेदना कमी व्हाव्यात यासाठी देण्यात येते. ते औषधांच्या चिठ्ठीशिवाय कुणालाही मिळू शकत नाही. तसे असल्यास ते या कुटुंबाला कुणी आणून दिले, ते खुल्या बाजारात चिठ्ठीशिवाय उपलब्ध आहे का, असेही प्रश्न निर्माण होतात. रात्री उलट्या सुरू झाल्यानंतर या कुटुंबाने खासगी डॉक्टरला बोलावले व त्याने औषध दिले. त्याचा अंश घेतलेल्या नमुन्यांमध्ये असू शकतो.
या कुटुंबातील मुलीच्या शवविच्छेदनानंतर रासायनिक विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये फुफ्फुसांत अन्नघटक किंवा स्राव(पान ८वर)






