ममता बॅनर्जी यांची ‘मतयंत्र’स्थळी धडक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्यरात्री मतयंत्र स्थळी भेट दिली. मतमोजणीत फेरफार झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनीही ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने मात्र गैरप्रकारांना वाव नसल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे तणाव वाढला आहे.

mamata banerjee raises voice against manipulation in voting process

‘मतमोजणी प्रक्रियेत फेरफार करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही’, असा इशारा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मध्यरात्री दिला. भवानीपूर मतदारसंघात झालेल्या मतदानाची ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी ममता यांनी गुरुवारी रात्री १२ वाजता भेट दिली. तेथे चार तास ठिय्या दिल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. दरम्यान, ‘मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकारांना वावच नाही’, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला.

प. बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष व भाजप यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमधून पुढे आल्यानंतर या दोन्ही पक्षांतील तणाव आणखी वाढला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कुणाल घोष व शशी पांजा यांनी एका मतदान केंद्राबाहेर धरणे आंदोलन केल्याने गुरुवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ममता यांनी आपल्या मतदारसंघाच्या मतदान केंद्रास भेट दिली. भवानीपूर मतदारसंघातील मतदानाची ईव्हीएम द. कोलकात्यातील सखावत मेमोरियल स्कूलमध्ये ठेवण्यात आली आहेत. या (पान ५वर)