मुंबई महापालिका अर्थसंकल्प मंजूर

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ८० हजार ९५२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाला. १२ दिवस चाललेल्या विक्रमी चर्चेनंतर मध्यरात्री सभागृहात या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्या भाषणांनंतर हा निर्णय झाला. मात्र, निधी वाटपातील असमानतेमुळे विरोधकांनी सभात्याग केला. हा अर्थसंकल्प निवडणुकीमुळे उशिराने सादर झाला होता.

mumbai municipal corporations 80 thousand crore budget approved

मुंबई महापालिकेच्या २०२६-२७च्या ८० हजार ९५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महापालिका मुख्यालयातील सभागृहात गुरुवारी मध्यरात्री मंजुरी मिळाली. १२ दिवस आणि ९४ तास अशा विक्रमी वेळेत पार पडलेल्या अर्थसंकल्पीय चर्चेत २२७पैकी १८८ नगरसेवकांनी सहभाग घेतला आणि या अर्थसंकल्पीय चर्चेचा गुरुवारी मध्यरात्री १ वाजता समारोप झाला.

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्या भाषणानंतर अर्थसंकल्पाला सभागृहात मंजुरी मिळाली. मात्र, नगरसेवकांना निधीच्या असमानतेचे वाटप, फसवे अर्थसंकल्प यासह अन्य मुद्यांवरून अर्थसंकल्प मंजुरीच्या वेळीच विरोधकांनी सभात्याग केला.

यंदाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प निवडणुकीमुळे उशिराने स्थायी समितीत सादर झाला. ४ फेब्रुवारीपर्यंत सादर होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर झाला. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीतही अर्थसंकल्पास मंजुरी मिळाली. या मंजुरीनंतर महापालिका सभागृहाची मंजुरीही मिळणे आवश्यक असते. त्याआधी अर्थसंकल्पावर (पान ५वर)