पेट्रोल, डिझेलही भडकण्याचे सूतोवाच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तेल कंपन्यांचा तोटा वाढत आहे. यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर इंधन दरवाढ होऊ शकते. विश्लेषकांनी प्रतिलीटर २५ ते २८ रुपयांपर्यंत दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकते.

potential huge increase in petrol and diesel rates

नवी दिल्ली : कच्च्या खनिज तेलाच्या दरात जागतिक स्तरावर सातत्याने वाढ होऊनही गेल्या चार वर्षांत तेल कंपन्यांनी किरकोळ विक्रीदरांत वाढ केली नव्हती. यामुळे तेल कंपन्यांचा तोटा सातत्याने वाढत आहे. यामुळेच नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे मतदान २९ एप्रिल रोजी संपल्यानंतर प्रतिलीटर २५-२८ रुपयांपर्यंत इंधन दरवाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी यापूर्वीच वर्तवली होती.