वॉशिंग्टन : युरोपीय महासंघाच्या ट्रक आणि कारवरील टेरिफ पुढील आठवड्यापासून २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केला. युरोपीय महासंघ व्यापार करार ाचे पूर्णत: पालन करीत नसल्याने हे टेरिफ लागू करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिका आणि युरोपीय महासंघ यांच्यात व्यापार करार झाला. त्यात बहुतांश वस्तूंवर १५ टक्के टेरिफ लावण्यात आले.






