अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दहा वर्षांच्या बालिकेवर ६० वर्षांच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी जगराम गोविंदा आडे याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली.
पीडित बालिकेच्या आईने ५ मे रोजी चान्नी पोलिसांत याविषयीची तक्रार दाखल केली होती. चार ड्रोन कॅमेरे आणि पथके तयार करून सावरगाव परिसरातील जंगलातून आडे याला ताब्यात घेण्यात आले.





