इराण फुटबॉल संघाचासराव अमेरिकेबाहेर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद उमटले आहेत. इराणचा सराव अमेरिकेत होणार होता, पण आता तो मेक्सिकोत होणार आहे. वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत ११ जून ते १९ जुलै दरम्यान होणार आहे. आर्यवीर दिवाणने १९ वर्षांखालील आशियाई ज्युनियर स्क्वॉश स्पर्धा जिंकली. लिओनेल मेस्सी अब्जाधीश झाला आहे. तन्वी पात्री ऑस्ट्रियन ओपनमध्ये उपविजेती ठरली.

iran football team to train outside america

फिनिक्स : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील इराणचे सर्व सामने अमेरिकेत आहेत. त्यांचा सरावही अमेरिकेत होणार होता. मात्र, आता स्पर्धापूर्व सराव मेक्सिकोत करण्यास इराण संघास मंजुरी देण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धा ११ जून ते १९ जुलै दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार आहे. इराणचा पहिला सामना १५ जूनला इंगलवूड (कॅलिफोर्निया) येथे न्यूझीलंडविरुद्ध आहे. इराण वर्ल्ड कपला सलग चौथ्यांदा आणि एकूण सातव्यांदा पात्र ठरला आहे.

आर्यवीर विजेता

नवी दिल्ली : भारताच्या आर्यवीर दिवाणने रविवारी १९ वर्षांखालील गटाची आशियाई ज्युनियर स्क्वॉश स्पर्धा जिंकली. त्याने निर्णायक लढतीत दक्षिण कोरियाच्या जाँगहेयॉकी ली याचा ११-२, ११-७, ११-९ असा पराभव केला. ही स्पर्धा जिंकणारा तो चौथा भारतीय आहे.

मेस्सी अब्जाधीश

न्यूयॉर्क : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीही आता अब्जाधीश झाला आहे. त्याची एकूण कमाई एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे. मेस्सीने २००७पासून फुटबॉलपटू म्हणून ७० कोटी डॉलरहून जास्त कमाई केली. अब्जाधीश झालेला मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतरचा दुसरा फुटबॉलपटू आहे.

तन्वीला उपविजेतेपद

नवी दिल्ली : भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी पात्री हिने ऑस्ट्रियन ओपन इंटरनॅशनल सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत तन्वी कॅनडाच्या राचेल चानकडून १४-२१, १७-२१ अशी पराभूत झाली.

मानसीला सुवर्णपदक

दा नांग (व्हिएतनाम) : मानसी लाथेर, काजल आणि सुमीत यांनी २३ वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या तीन सुवर्णपदकांसोबतच भारताच्या खात्यात दोन रौप्य आणि तीन ब्राँझपदके जमा झाली आहेत.