कारागृह अधिकाऱ्यांसह संशयिताची मद्यपार्टी

महाराष्ट्र टाइम्स

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर असलेला एक संशयित कारागृहाच्या आवारातील अधिकारी निवासस्थानाबाहेर अधिकाऱ्यांसोबत मद्यपान करताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही कारागृहात बंदी नशापाणी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या घटनेमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

suspects liquor party with jail officials goes viral in nashik road

फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर मुक्त असलेला संशयित हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातील अधिकारी निवासस्थानाबाहेर कारागृहाच्या अधिकाऱ्यांसोबत मद्यपार्टी करीत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कारागृह अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, या कारागृहात काही बंदी नशापाणी करीत असल्याचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर मुक्त झालेला संशयित हा कारागृहाच्या आवारातील अधिकारी निवासस्थानाबाहेर तीन अधिकाऱ्यांसोबत मद्यपान करीत असलेला व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. जामिनावर मुक्त असलेला संशयित हा अधिकाऱ्यासोबत कारागृह आवारातील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर दारूची पार्टी करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.