लखनौ : आयपीएल टी-२० क्रिकेटच्या सध्या सुरू असलेल्या मोसमात लखनौ सुपर जायंट्स संघाला तळाला समाधान मानावे लागले. त्यामुळे नव्या मोसमात संघ नेतृत्वात पूर्णपणे बदल होऊ शकतो, असे मत लखनौ संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी व्यक्त केले.
‘लखनौ’ गतमोसमात सातव्या क्रमांकावर राहिला होता. ‘नेतृत्वाचा विचार केल्यास हे नक्कीच पंतसाठी आव्हान ठरले. निकालातून हेच दिसते. या दडपणाचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला का हा प्रश्नही मनात येतो. सरता मोसम आमच्यासाठी खूपच अवघड होता.’ पंतला लिलावात २७ कोटी रुपये मिळाले होते. मात्र, त्याला चमक दाखवता आली नाही.




