शांतता समिती सदस्यांची हत्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी शांतता समितीच्या चार सदस्यांची हत्या केली. त्यांनी शस्त्रेही पळवली. दुसरीकडे, पंजाबमधील होशियारपूर येथे एका माजी सैनिकाच्या घरावर गोळीबार झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही घटनांमध्ये हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

brutal killing of peace committee members in pakistans northwest

पेशावर : पाकिस्तानच्या वायव्य भागात रविवारी दहशतवाद्यांनी स्थानिक शांतता समितीच्या चार सदस्यांची हत्या केली. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तालुक्यात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी समितीच्या ताब्यात असलेली शस्त्रेही पळवून नेली.

माजी सैनिकाच्या

घरावर गोळीबार

होशियारपूर : मोटारसायकलवरून अचानक आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी पहाटे दिवंगत माजी सैनिकाच्या घरावर गोळीबार केला. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी दिवंगत सुभेदार साधू सिंह यांचे कुटुंबीय घरात झोपले होते. माहिलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनोलियन गावात हा गोळीबार झाला.