‘डेक्कन’-‘आर्यन्स’मध्ये फायनल

महाराष्ट्र टाइम्स

डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज डेक्कन जिमखाना क्लब आणि आर्यन्स स्पोर्ट्स क्लब यांच्यात खेळला जाईल. उपांत्य फेरीत आर्यन्स संघाने युनायटेड स्पोर्ट्‌स क्लबवर व्हीजेडी पद्धतीने विजय मिळवला. तर डेक्कन जिमखाना संघाने पूना क्लबवर मात केली. आजच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘डेक्कन’-‘आर्यन्स’मध्ये फायनल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

डेक्कन जिमखाना क्लब आणि आर्यन्स स्पोर्ट्स क्लब यांच्यात ‘डेक्कन जिमखाना करंडक ’ टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. ही अंतिम लढत आज, सोमवारी होणार आहे.

डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात आर्यन्स स्पोर्ट् स क्लबने युनायटेड स्पोर्ट् स क्लबचा चार विकेटनी पराभव केला. या लढतीत पावसाचा व्यत्यय आला. व्हीजेडी पद्धतीनुसार आर्यन्स संघाने बाजी मारली. दुसऱ्या उपांत्य लढतीत डेक्कन जिमखाना संघाने पूना क्लबवर सहा विकेटनी मात केली.

‘डेक्कन’-‘आर्यन्स’मध्ये फायनल

‘डेक्कन’-‘आर्यन्स’मध्ये फायनल



‘डेक्कन’-‘आर्यन्स’मध्ये फायनल

संक्षिप्त धावफलक : युनायटेड स्पोर्ट् स क्लब - २० षटकांत ७ बाद १७२ (हर्ष ओसवाल ८७ (५५, २ चौकार, ६ षटकार), अक्षन काझी ४६, सुमीत मक्रकाली २-२१, अभिषेक आंब्रे २-३६) व्हिजेडी पद्धतीनुसार पराभूत वि. आर्यन्स स्पोर्ट्स क्लब - १६.३ षटकांत ६ बाद १४९ (महेश म्हस्के ७३ (४३, ९ चौकार, ३ षटकार), हर्ष सांगवी २३, आतिश कुंभार २३, आदित्य राजहंस ३-४२, श्रीनिवास लेहेकर २-३२).

पूना क्लब - २० षटकांत ७ बाद १८४ धावा (अभिनव तिवारी ४६, नौशाद शेख ४१, अर्जुन वाघ ३२, श्रीकांत मुंढे २१, अजय बोरूडे २-३१, आत्मन पोरे २-२६) पराभूत वि. डेक्कन जिमखाना क्लब - १९.५ षटकांत ४ बाद १८८ धावा (अजय बोरूडे नाबाद ४८ (२३, ५ चौकार, ३ षटकार), यश क्षीरसागर नाबाद ४३ (३०, ३ चौकार, २ षटकार), देवराज बेद्रे ४८ (३५, ६ चौकार, १ षटकार), क्रिश शहापूरकर ४०, दिव्यांग हिंगणेकर १-२७).