अवैध पार्किंगमुळे पर्यावरणीय हानीही होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. वाळूवर सतत होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे किनाऱ्याची नैसर्गिक रचना बदलत असून, वाळू दाबली जात आहे. किनाऱ्यालगतची झुडपे तुडवली जात असून, वाळूत राहणाऱ्या लहान खेकड्यांच्या अधिवासालाही धोका निर्माण झाला आहे. वाहनांच्या पार्किंगमुळे वाळू हळूहळू कडक होते. वाहनांमधून गळणारे तेल आणि इंधन यामुळे परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याकडे ‘जुहू बझबझ’ या स्थानिक सोशल मीडिया वाहिनीने लक्ष वेधले आहे.








