कोची : व्ही. डी. सतीशन यांना केरळचे मुख्यमंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी नेट्टूर येथे निदर्शने केली. सतीशन हे मूळचे नेट्टूर येथील आहेत. ‘निवडणुकीच्या लढाईत ज्याने आघाडी घेतली, त्यानेच राज्यावर राज्य करावे,’ अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली.
केरळमध्ये विधानसभा निवडणूक निकालातील यशानंतर काँग्रेसप्रणित यूडीएफमध्ये नेतृत्वावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत आमदारांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक मुकूल वासनिक आणि अजय माकन यांनी गुरुवारी आमदारांची बैठक घेतली. ‘उत्साही वातावरणात आमची बैठक पार पडली,’ असे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वासनिक यांनी सांगितले.
‘सर्व सहकारी, आमदारांशी चर्चा केली. आता दिल्लीकडे रवाना होत आहोत,’ असेही वासनिक म्हणाले.





