सिंधुदुर्गात जहाजबांधणीचा विचार

महाराष्ट्र टाइम्स

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणीचा प्रकल्प उभारण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. मंत्री नीतेश राणे यांनी परिसरातील जागेची पाहणी करून वन विभागाच्या अडचणींचा आढावा घेण्याचे सांगितले. नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग यांसारख्या संभाव्य स्थळांचा तांत्रिक व आर्थिक अभ्यास केला जाईल. गुंतवणूकदारांना प्राथमिक माहिती देण्यासाठी नियोजन केले जाईल. या प्रकल्पांमुळे सागरी विकासाला चालना मिळेल.

shipbuilding project sites in sindhudurg and minister nitesh ranes instructions

‘गोव्याच्या सर्वाधिक जवळ असलेला आणि सागरी विकासासाठी सक्षम असलेला भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. परिसरातील ३० एकर जागेची ओळख पाहणी करून वन विभागाच्या अडचणींचा आढावा घ्यावा; तसेच संभाव्य स्थळांचे तत्काळ प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा,’ असे मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.

राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यास प्राधान्य देत संबंधित स्थळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, पुनर्भरण, ट्रॅफिक लाँचिंग; तसेच पायाभूत सुविधांबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले.

जहाजबांधणी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना प्राथमिक स्वरूपातील माहिती व अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले. राज्यात जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी संभाव्य स्थळांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. जहाजबांधणी प्रकल्पासाठी संभाव्य स्थळांबाबतची तांत्रिक क्षमता, समुद्रातील खोली, भूगर्भीय स्थिती संदर्भात सादरीकरण करण्यात आले.