दोनशे रुपयांचा गजरादोन हजारांना विकला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अहिल्यानगर येथे एक धक्कादायक प्रकार घडला. शिर्डीतील एका फूल विक्रेत्याने मुंबईहून आलेल्या भक्ताला दोनशे रुपयांचा मोगऱ्याचा गजरा तब्बल दोन हजार रुपयांना विकला. 'बाबांना पहिला गजरा तुमचाच जाईल' असे भावनिक आवाहन करून नंतर जास्त पैसे मागितल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र लाभशंकर मेहता यांनी तक्रार केली आहे.

two hundred rupee garland sold for two thousand case registered against busy flower seller in shirdi

अहिल्यानगर : शिर्डीतील एका फूल विक्रेत्याने मुंबईतील भक्ताला दोनशे रुपयांचा मोगऱ्याचा गजरा तब्बल दोन हजार रुपयांना विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बाबांना पहिला गजरा तुमचाच जाईल,’ असे भावनिक आवाहन करून सुरुवातीला गजऱ्याची किंमत न सांगता नंतर दोन हजारांची मागणी केल्याचा या विक्रेत्यावर आरोप आहे. पोलिसांनी संजय देशमुख या गजरा विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र लाभशंकर मेहता असे तक्रारदाराचे नाव असून, ते शिर्डीला दर्शनासाठी आले होते.