आयशर खांबाला धडकून अपघात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वाळूज महानगरमध्ये एक धक्कादायक अपघात घडला. बजाजनगर येथील गोरख वाघ चौकात आयशर ट्रकच्या केबिनचे लॉक अचानक उघडले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक हायमास्ट खांबाला जाऊन धडकला. सुदैवाने, तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने चालकाला सुखरूप बाहेर काढले. हा अपघात शनिवारी दुपारी घडला.

eicher truck accident driver loses control and crashes into high mast pole

वाळूज महानगर : आयशर ट्रकच्या केबिनचे लॉक उघडल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बजाजनगर येथील गोरख वाघ चौकातील हायमास्ट खांबाला धडकून शनिवारी अपघात झाला. शनिवारी दुपारी सचिन जाधव आयशर ट्रक घेऊन एमआयडीसीतील एका कंपनीत जाताना गोरख वाघ चौकात अचानक त्यांच्या गाडीच्या केबिनचे लॉक उघडले. त्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक चौकातील हायमास्ट खांबाला जाऊन धडकला. तेथून जाणारे विशाल खंडागळे यांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.