New Career Opportunities Opened Educational Expo In Mumbai
उघडली करिअरची नवीन दालने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबईसह विविध भागांमधून विद्यार्थी आणि पालकांनी एज्युकेशन एक्स्पोमध्ये हजेरी लावली. त्यांनी विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली. या उपक्रमाने करिअरच्या नवीन संधींची दालने उघडली. पालकांनी समाधान व्यक्त केले. या एक्स्पोमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली.
दोन दिवस झालेल्या या एज्युकेशन एक्स्पोसाठी मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, पनवेल, नाशिक अशा विविध भागांमधून पालकांसह विद्यार्थ्यांनी हजेरी लावत करिअरबाबत आणि विविध अभ्यासक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. या उपक्रमामुळे करिअरची नवीन दालने खुली झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.