‘द्रोही नव्हे, तर आम्ही विद्रोही’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा येथे १५व्या विद्रोही साहित्य संमेलनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रा. सोनाझरिया मिंझ यांनी विचार मांडले. प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील आवाज हा विद्रोह असतो, द्रोह नाही असे त्या म्हणाल्या. संमेलनात छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे स्मारक किल्ले अजिंक्यतारा येथे व्हावे, तसेच प्रतिसरकारचे स्मारक भव्य जागी व्हावे यासाठी ठराव मांडण्यात येणार आहे. डॉ. भारत पाटणकर यांनी ही माहिती दिली.

rebels attempt to label our voice as treason

सातारा : ‘प्रस्थापित व्यवस्थेविरोधात नेहमीच आवाज उठवला जातो. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न नंतर सत्ताधारी आणि प्रस्थापित व्यवस्था द्रोहाच्या नावाखाली करते. खरे तर तो आमचा व्यवस्थेविरोधातील विद्रोह असतो. त्यामुळे आम्ही द्रोही नसून, विद्रोही आहोत,’ असे प्रतिपादन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. सोनाझरिया मिंझ यांनी केले. येथे आयोजित १५व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.

दरम्यान, ‘ छत्रपती शाहू महाराज (थोरले) आणि महाराणी ताराराणी यांचे स्मारक किल्ले अजिंक्यतारा येथे, तर प्रतिसरकारचे स्मारक भव्य जागी व्हावे यासाठी संमेलनात ठराव करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर दिली.