महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३७मधील खराब रस्त्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत रखडलेले काम पुन्हा सुरू केले. राधे मंगलम सभागृह चौक ते टेलिकॉमनगर मैदानापर्यंतचे डांबरीकरण उखडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ‘काम सुरू झाले याचा आनंद आहे; मात्र यात पुन्हा खंड पडायला नको’, अशी अपेक्षा प्रभाकर चौधरी, सचिन द्रवेकर, छोटू बोरीकर, विवेक जोशी यांनी व्यक्त केली.





