वनकर्मचाऱ्यांना दिले जाणार विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आहे. श्वानांमधून वाघ आणि इतर प्राण्यांना कॅनाइन डिस्टेम्पर हा आजार पसरण्याचा धोका आहे. यावर उपाय म्हणून वनविभागाने विशेष प्रशिक्षण सुरू केले आहे. वनकर्मचारी आता रोगाची लक्षणे ओळखतील. संशयित नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित माहिती दिली जाईल. राष्ट्रीय व्याघ्रसंरक्षण प्राधिकरणाने या सूचना दिल्या आहेत.

wildlife protection special training for forest staff

नागपूर : श्वानांपासून वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांमध्ये ‘ कॅनाइन डिस्टेम्पर ’ पसरण्याचा धोका लक्षात घेता वनविभागाने गांभीर्याने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. या रोगापासून वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय व्याघ्रसंरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. वन कर्मचाऱ्यांना रोगाची प्रारंभिक लक्षणे ओळखणे, संशयित प्रकरणांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविणे, संशयास्पद प्रकरण आढळल्यास त्याची त्वरित माहिती वरिष्ठ कार्यालयांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्रसंरक्षण प्राधिकरणाचे वनमहानिरीक्षक डॉ. संजयन कुमार यांनी दिल्या आहेत.