तीन संशयितांना ‘यूपी’मधून अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणातील तीन संशयितांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. या हत्येचा कट रचण्यात किमान आठ जणांचा सहभाग होता. संशयितांनी हत्येपूर्वी परिसराची पाहणी केली होती. तांत्रिक पाळत आणि डिजिटल ट्रॅकिंगमुळे हल्लेखोरांनी वापरलेली कार बाली टोल नाक्यावरून गेल्याचे समोर आले. पुढील तपास सुरू आहे.

arrest of three suspects from up involvement in the murder case of shuvendu adhikaris colleague

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणातील तीन संशयितांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) उत्तर प्रदेशमधून अटक केली. या हत्येचा कट रचण्यात आणि तो प्रत्यक्षात आणण्यात किमान आठ जणांचा सहभाग होता. संशयितांनी हत्येपूर्वी संपूर्ण परिसराची पाहणी केली होती. तांत्रिक पाळत आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे हल्लेखोरांनी वापरलेली कार बाली टोल नाक्यावरून गेल्याचे समोर आले.