ठाणे : येथील आचार्य अत्रे कट्ट्याच्या वतीने रविवार, २४ मे रोजी तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे कृतज्ञता पुरस्कार दिले जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक सभागृह, वारकरी भवन, गजानन महाराज मंदिराजवळ, राम मारूती रोड, ठाणे (प) येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात यावेळी डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठान पूर्वांचल विकास प्रकल्प, काल्हेर येथील स्मित वृद्धाश्रम आणि पेण येथील आई डे केअर सेंटर या तीन संस्थांना प्रत्येकी एक लाख रूपयांचा कृतज्ञता निधी दिला जाईल. अनंत मराठे, सुचित्रा चंदगडकर आणि अनुश्री भिडे कृतज्ञता पुरस्कार निधीचे प्रायोजक आहेत.







