ऑनलाइन स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळा

महाराष्ट्र टाइम्स

मिती ग्रुप आणि कलाविष्कार यांनी दोन दिवसीय ऑनलाइन स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा ३० आणि ३१ मे रोजी संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत होईल. वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियासाठी प्रभावी लेखनाचे मार्गदर्शन मिळेल. अभिराम भडकमकर आणि रोहिणी निनावे हे तज्ञ मार्गदर्शन करतील. २७ मे पर्यंत नोंदणी करता येईल. सहभागींना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

ऑनलाइन स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मिती ग्रुप आयोजित आणि कलाविष्कार प्रस्तुत दोन दिवसीय ऑनलाइन स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळेचे आयोजन ३० आणि ३१ मे रोजी संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत करण्यात आले आहे. लेखन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेले तरुण, नवोदित लेखक, सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ शोधणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उत्तम संधी ठरणार आहे. बदलत्या डिजिटल युगात वेब सिरीज, चित्रपट, नाटक आणि सोशल मीडिया कंटेंटसाठी प्रभावी लेखनाची मागणी सातत्याने वाढत असून, याच पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा होत आहे.

कथा सुचण्यापासून ते तिचे प्रभावी पटकथेत रूपांतर करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास या कार्यशाळेत उलगडून सांगितला जाणार आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे संवाद, लक्षवेधी प्रसंगरचना, पात्रांची मांडणी आणि दृश्य माध्यमांसाठी आवश्यक असलेली लेखनशैली याबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. कल्पनाशक्तीला प्रभावी शब्दरूप देत आकर्षक पटकथा कशी तयार करावी, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणही दिले जाईल.

‘बालगंधर्व’, ‘पछाडलेला’, ‘खबरदार’, ‘पाऊलवाट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे लेखक अभिराम भडकमकर आणि ‘दामिनी’, ‘अवंतिका’, ‘पुढचं पाऊल’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘आई कुठे काय करते’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे लेखन केलेल्या लेखिका रोहिणी निनावे यांचे या कार्यशाळेला मार्गदर्शन लाभणार आहे.

यात सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. लेखनाची आवड असलेला प्रत्येकजण, सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणारे तरुण, नवोदित लेखक तसेच, स्वतःच्या कल्पनांना सर्जनशील दिशा देऊ इच्छिणारे सर्वजण या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. कार्यशाळा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

इच्छुकांनी २७ मे २०२६पूर्वी नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क : ९०८२० ७८२०४.